सोलापूर : ब्रम्हदेवदादा माने सहकारी बँक लि.,सोलापूर यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी “सुरेल मैफल – दिवाळी पहाट” या भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सा रे ग म प महाविजेती गायिका कार्तिकी गायकवाड यांनी आपल्या सुरेल आवाजाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सुमधुर सादरीकरणाने सभागृहात सुरांचा वर्षाव झाला. दिवाळीच्या शुभप्रसंगी आयोजित हा कार्यक्रम सोलापूरकरांसाठी एक अविस्मरणीय संगीतसोहळा ठरला. बँकेच्या सुवर्ण महोत्सवी प्रवासाचा आनंद आणि दिवाळीचा उत्साह या सुरेल कार्यक्रमातून अधिकच उजळून निघाला.









