Saturday, December 6, 2025
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

नगरसेविका होण्याच्या महत्त्वकांक्षेने नवऱ्याचा घात: पत्नीने पतीचा केला गळा आवळून खून

राजेश भोई by राजेश भोई
October 24, 2025
in क्राईम, महाराष्ट्र
0
नगरसेविका होण्याच्या महत्त्वकांक्षेने नवऱ्याचा घात: पत्नीने पतीचा केला गळा आवळून खून
0
SHARES
23
VIEWS

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात उशिरा रात्री घडलेल्या एका घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. शरद पवारांच्या पक्षाच्या समर्थक आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याचा पत्नीनेच गळा आवळून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नकुल भोईर असं मृत व्यक्तीचं नाव असून, तो शहरात विविध सामाजिक उपक्रम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या राजकीय कार्यक्रमात सक्रिय होता.

या प्रकरणातील पत्नी चैताली भोईर या आगामी महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवक पदाच्या इच्छुक असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, दोघांमध्ये काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या वादातूनच चैतालीने ओढणीने गळा दाबून नकुलचा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. चिंचवड पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक करून चौकशी सुरू केली आहे.

ही घटना चिंचवड परिसरातील नकुल आणि चैताली यांच्या राहत्या घरी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली. रात्री उशिरा नकुल आणि चैताली यांच्यात पुन्हा एकदा वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात चैतालीने घरातील ओढणीने पतीचा गळा दाबला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काही वेळानंतर नकुल बेशुद्ध पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. दोन आणि पाच वर्षांची लहान मुलं शेजारच्या खोलीत झोपलेली असताना घराच्या हॉलमध्ये हा सगळा प्रकार घडला.

घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून, आरोपी पत्नीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिक धक्कादायक अवस्थेत आहेत.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; वारंवारचे वाद ठरले घातक
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, नकुल भोईर पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. या संशयावरून त्यांच्यात सतत वाद व्हायचे. चैताली ही प्रकृतीने मजबूत आणि आत्मविश्वासू स्त्री असून, तिचा स्वभावही हट्टी असल्याचे सांगितले जाते. मध्यरात्री झालेला वादही हाच मुद्दा घेऊन सुरू झाला. नकुलने पुन्हा आरोपात्मक बोलणे सुरू केले, त्यावरून संतापलेल्या चैतालीने ओढणी घेऊन नकुलचा गळा दाबला. काही क्षणांत नकुलचा श्वास थांबला. मुलं झोपेत असतानाच हा संपूर्ण प्रकार घडला. पोलिसांच्या मते, ही घटना पूर्णतः कौटुंबिक रागातून घडली असून, यामागे कोणताही पूर्वनियोजित हेतू नाही. तथापि, आरोपीची चौकशी सुरू आहे आणि पोलिस सर्व कोनातून तपास करत आहेत.

Previous Post

सलग चार दिवस सुट्टीमुळे स्वामी समर्थ मंदिर भाविकांसाठी २० तास खुले..

Next Post

मनोज जरांगेंची 2 नोव्हेंबरला शेतकऱ्यांसाठी बैठक; लढण्याचा अन् जिंकण्याचा संकल्प

Related Posts

सावकाराच्या तगाद्याने इसमाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ केला रेकॉर्ड
क्राईम

सावकाराच्या तगाद्याने इसमाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ केला रेकॉर्ड

November 29, 2025
तिहेरी घरफोडी करणाऱ्या दोन आंतरराज्य गुन्हेगारांना अटक
क्राईम

तिहेरी घरफोडी करणाऱ्या दोन आंतरराज्य गुन्हेगारांना अटक

November 29, 2025
स्थानिक निवडणुकांना कोणताही ब्रेक नाही; मात्र ४० नगरपरिषदा, १७ नगरपंचायतींचा निर्णय अंतिम निर्णयाच्या अधीन
महाराष्ट्र

स्थानिक निवडणुकांना कोणताही ब्रेक नाही; मात्र ४० नगरपरिषदा, १७ नगरपंचायतींचा निर्णय अंतिम निर्णयाच्या अधीन

November 28, 2025
शिक्षण उपनिरीक्षकाच्या केबिनमधून १.२० लाख तर घरातून ५६ हजार जप्त..!
महाराष्ट्र

शिक्षण उपनिरीक्षकाच्या केबिनमधून १.२० लाख तर घरातून ५६ हजार जप्त..!

November 27, 2025
शालार्थ आयडीसाठी लाखाची लाच प्रकरण; २९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी
महाराष्ट्र

शालार्थ आयडीसाठी लाखाची लाच प्रकरण; २९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

November 27, 2025
शालार्थ आयडीचा वेतन चालू करण्यासाठी एक लाखाची लाच घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात..
क्राईम

शालार्थ आयडीचा वेतन चालू करण्यासाठी एक लाखाची लाच घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात..

November 25, 2025
Next Post
मनोज जरांगेंची 2 नोव्हेंबरला शेतकऱ्यांसाठी बैठक; लढण्याचा अन् जिंकण्याचा संकल्प

मनोज जरांगेंची 2 नोव्हेंबरला शेतकऱ्यांसाठी बैठक; लढण्याचा अन् जिंकण्याचा संकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025