सोलापूर :24 सप्टेंबर रोजी शुक्रवारी सायंकाळी नऊ वाजेच्या सुमारास सोलापूरहुन कामावरून घरी जात असताना अचानक गाडी समोर कुत्रा आडवा आल्याने मंगळवेढा रोड येथील देगाव टोल नाक्या समोर तिऱ्हे येथील रहिवासी शुभांगी सुनील मल्लाव ( वय 23) यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,सासू-सासरे, दीर ,आई-वडील, भाऊ असा त्यांचा परिवार आहे.. आज त्यांच्यावर सकाळी नऊ वाजता तिऱ्हे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, मल्लाव परिवारात दुःखाचा डोंगर पसरला आहे…












