सोलापूर : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या हिवाळे – 2025 परीक्षेत ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले. सर्व विभागातून प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील एकूण 884 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 396 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले तर 267 विद्यार्थी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाले. कंप्यूटर इंजीनियरिंग विभागातील कुमारी अंकिता चव्हाण हिने 95.29% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग : हुमाझरीन सय्यद 91.41% प्रथम वर्ष , समर्थ कोरे 94.94% द्वितीय वर्ष , अंकिता चव्हाण 95.29% तृतीय वर्ष
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन इंजीनियरिंग विभाग : संजना गरदास 87.18% प्रथम वर्ष हौसाबाई जाधव 94.56% द्वितीय वर्षकुमार आर्यन गुरव 94.12% तृतीय वर्ष
सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग : अनुष्का कोकरे 91.41% प्रथम वर्ष समर्थ धुमाळे 83.18% द्वितीय वर्ष कुणाल माढेकर 85.89% तृतीय वर्ष
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग : झीशान शेख 92.47% प्रथम वर्ष वेदांत ताटी 89.33% द्वितीय वर्षसत्येंद्रकुमार ठाकूर 90.82% तृतीय वर्ष
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग : वमन दुबे 84% प्रथम वर्ष श्रुती नडगिरी 90.71% द्वितीय वर्ष यशराज कोरेकर 94% तृतीय वर्ष
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर पाटील तसेच संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले व उपप्राचार्य श्री एस. के. मोहिते यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, विभाग प्रमुखांचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले.










