मृदंग महर्षी आण्णाबुवा यादव स्मरणार्थ
सोलापूर : मृदंग महर्षी गुरुवर्य वै. ह. भ. प. अण्णाबुवा यादव यांच्या ९ व्या पुण्यस्मरणार्थ तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन शिक्षण संस्था, सोलापूर यांच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त १०८ मृदंग वादक विद्यार्थ्यांचा भव्य मृदंग वादन सोहळा संपन्न झाला.हा कार्यक्रम रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत शिवस्मारक सभागृह, शिंदे चौक, नवीपेठ, सोलापूर येथे संपन्न झाला .

सुरुवातीला वारकरी दिंडी मध्ये पाऊल घेण्यात आला त्यानंतर १०८ मृदंग वादक विद्यार्थी यांचे मृदंग वादन झाले .या मध्ये पंचपदी, सरपटी, मुखडे, तुकडे, शास्त्रीय वादन तसेच अभंग गायन झाले .या मध्ये मृदंग महर्षी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावर्षी सोलापूरचे सुप्रसिद्ध मृदंग वादक कै. सन्मुख अण्णा म्हेत्रे यांच्या स्मरणार्थ मरणोत्तर विशेष मृदंगमहर्षी पुरस्कार त्यांच्या परिवाराला प्रदान करण्यात आला तसेच ह. भ. प. विलास महाराज कोकितकर व ह. भ. प. गोविंद महाराज माने यांना मृदंगमहर्षी पुरस्काराने गौरविण्यात येणार आले .या सोहळ्यात सोलापूर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायामध्ये कार्यरत असलेल्या महाराज मंडळींचा सन्मानही करण्यात येणार आला .
या कार्यक्रमा मध्ये प्रमुख उपस्थिती ह. भ. प. स्वामी महाराज राशिनकर (पंढरपूर) व ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ) व सोलापुरातील गायक वादक महाराज मंडळी यांची होती.या कार्यक्रम आयोजन ह. भ. प. ज्योतीराम महाराज चांगभले (प्रदेश अध्यक्ष) वारकरी मंडळ यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह. भ. प. हनुमंत भोसले, ह. भ. प. सुरज यादव, सुनील चांगभले, गणेश चांगभले तसेच संगीत विशारद प्रणिती चांगभले यांनी प्रयत्न केले.









