सोलापूर – पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथे पोलीस दलातील अधिकारी व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी दि. 20 फेब्रुवारी रोजी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये डॉ हेमंत लोढा (रुद्राक्ष थेरपी) यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची तपासणी केली. या आरोग्य शिबिरामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस घटकातील सुमारे 200 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उपस्थिती दर्शवली.
- डॉ हेमंत लोढा यांनी त्यांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार केले तसेच त्यांना रुद्राक्ष थेरपी देण्यात आली. सदर आरोग्य शिबिर दी. 21 फेब्रुवारी देखील उर्वरित पोलीस अधिकारी व अंमलदार यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन करत पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे आयोजन वेळोवेळी करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक. कुंभार, पोवार, देशपांडे, सहा पोलीस निरीक्षक, कदम, जकिकोरे तसेच रापोनि कांबळे उपस्थित होते.










