सोलापूर: नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), सोलापूर शाखा आणि ए.सी.एस. हॉस्पिटल (ACS Hospital) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी “एसीएस निमाकॉन २०२५” ( ACS NIMACON 2025) या भव्य राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन महालक्ष्मी बँक्वेट्स सोलापूर येथे करण्यात आले आहे. राज्यभरातून हजाराहून अधिक डॉक्टरांनी या कॉन्फरन्स साठी रजिस्ट्रेशन केले आहे.
सकाळी नऊ वाजल्यापासून कॉन्फरन्सला सुरुवात होणार असून अकरा वाजता गोवा राज्याचे मुख्यमंत्री मा. डॉ. प्रमोद सावंत यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून निमा केंद्रीय शाखेचे अध्यक्ष डॉक्टर आशुतोष कुलकर्णी, डॉ. शांतीलाल शर्मा, डॉ. विनायक टेंभुर्णीकर, डॉ. गजानन पडघन, डॉ.सायबू गायकवाड, डॉ.शैलेश निकम, डॉ. वैशाली पडघन, डॉ. मृण्मयी मासोदकर, राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. राजू ताटेवार, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. तुषार सूर्यवंशी, डॉ. सोपान खर्चे डॉ. रविराज गायकवाड, तसेच mcim सदस्य डॉ. सचिन पांढरे , डॉ.अभय लुनावत, एसीएस हॉस्पिटलचे संचालक डॉ.एसीएस हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ.राहुल कारीमुंगी, डॉ. प्रमोद पवार, डॉ सिद्धांत गांधी ,डॉ. दीपक गायकवाड पाटील , निमा वूमन फोरम चे डॉ. अमिता कोकडे डॉ. प्रज्ञा खोसे ,डॉ.मीनाक्षी गवळ , डॉ.अनुश्री मुंडेवाडी, डॉ. राजश्री मठ, यांची उपस्थिती राहणार आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील नवीन संशोधन आणि प्रगत उपचार पद्धतींची माहिती डॉक्टरांना मिळावी, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या एकदिवसीय परिषदेत विविध तज्ज्ञ डॉक्टर वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये डॉ. प्रशांत दोंड , डॉ. डी. जी. सपले, हृदयरोग चर्चासत्र : ए.सी.एस. हॉस्पिटलचे डॉ. राहुल कारीमुंगी, डॉ. प्रमोद पवार, डॉ. सिद्धांत गांधी आणि डॉ. दीपक गायकवाड तसेच डॉ. सुनील हिलालपुरे, डॉ. विनोद बन, डॉ. सुजित जहागीरदार , डॉ. रणजित कदम, डॉ. मीनल चिडगुपकर आणि डॉ. प्रफुल्ल कल्याणकर आदीचा समावेश असल्याची माहिती निमाचे प्रसिद्धी प्रमुख डॉ. उत्कर्ष वैद्य यांनी दिली आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट हेड डॉ. सुभाष भांगे , डॉ. अमोल माळगे , डॉ.असिफ शेख, डॉ. अभिजीत पुजारी, डॉ. नितीन बलदवा,निमा शाखेचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डी मनी , डॉ. प्रवीण ननवरे , वूमन फोरम अध्यक्षा डॉ. श्रुती मराठे, डॉ. अश्विनी देगावकर , डॉ. पल्लवी भांगे, स्टूडेंट फोरम चे डॉ. समर्थ वाले व सर्व कमिटी चेअरमन व निमा सदस्य परिश्रम घेत आहेत.










