सोलापूर ; पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांच्याकडून महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने धडाकेबाज प्रतिबंधक कारवाईस करण्यात आली असून ०२ दिवसांमध्ये रेकॉर्डवरील ०३ सराईत गुन्हेगारांना M.P.D.A. अंतर्गत केले स्थानबध्द करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. आत्तापर्यंत पोलीस आयुक्तांनी कार्यभार स्विकारल्यापासून 50 सराईत गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. महानगर पालिका निवडणुक प्रक्रिया निर्भड वातावरणात सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टीने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त, सोलापूर शहर एम. राज कुमार यांनी मागील दोन दिवसांत 03 सराईत गुन्हेगारांवर M.P.D.A. अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
यामध्ये मिथुन धनसिंग राठोड वय 33 वर्षे रा. घोडतांडा, द. सोलापूर जि. सोलापूर हा एक सराईत हातभट्टीवाला असून, स्थानबध्द इसम हा जेलरोड पोलीस ठाणे हद्दीत व आजुबाजुच्या परिसरात बऱ्याच वर्षापासून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टीची विक्री करण्यासाठी अनेक हातभट्टी-दारुचे गुत्ते अड्डे चालवत आहे. अशा प्रकारे स्थानबध्द इसम हा महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 मधील तरतुदीचा भंग करुन पोलीसांची नजर चुकवुन गावठी हातभट्टी दारुची वाहतूक, पुरवठा आणि विक्री करणे या सारखे गुन्हे करण्यात गुंतलेला आहे.
सलमान गुडु पटेल, वय 27 वर्षे, रा. प्लॉट नं. 72, विष्णु नगर भाग-2, मजरेवाडी, सोलापूर हा त्याच्या साथीदारासह जेलरोड व एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरात चाकु, सुरा, लोखंडी पाईप, लोखंडी रॉड, कोयता आणि काठी यासारख्या जिवघेण्या घातक शस्त्रानिशी फिरुन इच्छापुर्वक जबर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, विनयभंग करणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, धाकदपटशा करणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, गृहअतिक्रमण करणे, दगडफेक करणे, घातक शस्त्रांनी धमकवणे या सारखे गुन्हे करीत आहे.
अश्रफअली उर्फ टिपू मन्नान ऊर्फ मुनाफ बागवान, वय 33 वर्षे, रा. 793 शुक्रवार पेठ, सोलापूर हा त्याच्या साथीदारासह फौजदार चावडी पोलीस ठाणे परिसरात चाकु, सुरा, लोखंडी पाईप, लोखंडी रॉड, कोयता आणि काठी यासारख्या जिवघेण्या घातक शस्त्रानिशी फिरुन इच्छापुर्वक जबर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, विनयभंग करणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, धाकदपटशा करणे, तडीपार आदेशाचा भंग करणे, गृहअतिक्रमण करणे, दगडफेक करणे, घातक शस्त्रांनी धमकवणे या सारखे गुन्हे करीत आहे.










