विवाह सोहळा उत्सवाचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांची माहिती
सोलापूर : सिद्धेश्वर यात्रेतील मुख्य अक्षता सोहळा मंगळवारी १३ जानेवारीला होणार आहे. गेल्या वर्षीसारखा यंदाही अक्षता सोहळा दुपारी एकच्या आत करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.यात्रेत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा योगदंड आणि कुंभार कन्या यांचा विवाह सोहळा लावण्याची प्रथा आहे. त्यासाठी सात नंदीध्वज हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सकाळी सिद्धेश्वर मंदिराकडे प्रस्थान करतील. तत्पूर्वी सकाळी सात वाजता पूजा होईल. मंदिर परिसरातील संमती कट्ट्याजवळ विवाह सोहळा होईल. मिरवणुकीत विलंबाच्या अनावश्यक गोष्टी टाळून वेळेत नंदीध्वज मंदिर परिसरात येतील, असेही त्यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षापासून हा सोहळा लवकर पार पडत आहे.
९०० वर्षांची परंपरा लाभेल्या ग्रामदैवत शिवयोगी सिध्देश्वर महाराज यांच्या यात्रेस सोमवार ता. १२ पासून सुरुवात होत आहे. दि. १२ ते १६ जानेवारी या पाच दिवसांत धार्मिक विधी होणार आहेत. मुख्य विधी अक्षता सोहळा. मंगळवार, ता. १३ रोजी दुपारी एक वाजता सिध्देश्वर मंदिरातील संमती कट्ट्याजवळ होईल, अशी माहिती यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- शनिवार १० जानेवारी
सिद्धेश्वर महाराजांचा योगदंड हिरेहब्बू वाड्यातून मठपती (स्वामी) हे शुक्रवार पेठेतील रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात आणतात. अॅड. मिलिंद थोबडे व परिवाराकडून सकाळी अकराला पूजा करतात. हिरेहब्बू यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा होते. महाप्रसाद असतो. - रविवार ११ जानेवारी
सिद्धरामेश्वच्या अक्षता सोहळ्या निमित्त रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी हिरेहब्बू वाड्यात नंदीध्वजाला साज चढविण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. - सोमवार १२ जानेवारी
सकाळी ८ वा. हिरेहब्ब वाड्यात पहिल्या व दुसऱ्या 12 नंदीध्वजाची पूजा. सातही नंदीध्वज, पालखी, मानकरी यांच्यासह यण्णीमज्जन कार्यक्रम, ६८ शिवलिंग प्रदक्षिणास सुरुवात होईल, सिध्देश्वर मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात तैलाभिषेक होईल. नंदीध्वजाला खारीक, खोबरे, लिंबू हार बांधतात. - मंगळवार १३ जानेवारी
सकाळी सात वाजता हिरेहब्बू वाड्यातून नंदीध्वज अक्षता सोहळ्यासाठी मार्गस्थ होतील. या दिवशी नंदीध्वजाला बाशिंग बांधतात. दुपारी एक वाजता संमती कट्ट्याजवळ अक्षता सोहळा. नंतर ६८ शिवलिंग प्रदिक्षणा, पंचामृत अभिषेक करून नंदीध्वज वाड्यात येतात. - बुधवार १४ जानेवारी
सकाळी १० वा. सिध्देश्वर तालावात नंदीध्वजाचा . करमुटगी विधी. गंगा पूजन, सतीहवन पूजा, अमृतलिंगाजवळ हा कार्यक्रम असतो. सायं. ५ वा. होम विधीसाठी नंदीध्वज मिरवणूक. रात्री नऊला होमविधी. रात्री अकरा वाजता मंदिराजवळ भाकणूक विधी. - गुरुवार १५ जानेवारी
रात्री आठनंतर होम मैदानावर शोभेचे दारूकाम. त्याअगोदर वाड्यातून नंदीध्वजाची मिरवणूक निघते. ही मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी असते. होम मैदानावर सायंकाळी सातला लेसर शो होईल. रात्री नऊ नंतर आकर्षक असे शोभेचे दारूकाम होईल. यामध्ये - शुक्रवार १६ जानेवारी
सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर सिद्धेश्वर यात्रेचा समारोप शुक्रवारी होणार आहे. या दिवशी सकाळी अकरा वाजता देशमुख यांच्या वाड्यात योगदंडाची महापूजा केली जाते. त्याच बरोबर महाप्रसादही दिली जातो. रात्री नऊला मल्लिकार्जुन मंदिरात कप्पडकळ्ळी महापूजा (नंदीध्वज वस्त्र विसर्जन) मंदिर प्रदक्षिणा आणि यात्रा समारोप.

विविध समित्यांचे प्रमुख
- १. श्री सिध्देश्वर यात्रा मध्यवर्ती समिती : श्री महादेव बाबुराव चाकोते
- २. जागा वाटप समिती : श्री प्रकाश संगप्पा बिराजदार
- ३. मिरवणूक समिती : अॅड. श्री मिलिंद शिवशंकर थोबडे
- ४. रंग व विद्युत रोषणाई समिती : श्री शिवकुमार शिवलिंगप्पा पाटील
- ५. पशुप्रदर्शन व विक्री समिती : श्री निलकंठप्पा मडिवाळप्पा कोनापूरे
- ६. शोभेचे दारुकाम समिती : अॅड. श्री विश्वनाथ शिवलिंगप्पा आळं
- ७. प्रसाद वाटप समिती : श्री रतन विश्वनाथ रिक्के
- ८. प्रचार व प्रसिध्दी समिती : प्रा. राजशेखर रामलिंग येळीकर
- ९. कृषी प्रदर्शन समिती : श्री गुरूराज रूद्रेश माळगे










