सोलापूर : स्व.विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून नाव नोंदणीची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर असणार आहे.
संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा
वधूस – लग्नाचे वस्त्र, शालू, मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास – विवाहाकरिता सफारी व हळदी पोशाख दिले जाईल. त्याचबरोबर हार-बाशिंग-तुरे, संसारोपयोगी भांडी, कपाट, अंतरपाट देण्यात येईल. वधू-वर दोन्ही परिवाराकडील प्रत्येकी १०० पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल आणि सवाद्य मिरवणूक/वरात आयोजकांकडून काढली जाईल.
तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवाराने आमदार देवेंद्र राजेश कोठे यांच्या मुरारजी पेठ येथील संपर्क कार्यालय येथे संपर्क साधावे.
- संपर्क क्रमांक 8055122233 / 9822611677
- विवाह सोहळा : दि. बुधवार २६ नोव्हेंबर २०२५ । संध्याकाळी ५ वा ४२ मिनिट
- विवाहस्थळ : कै.लिंगराज वल्याळ क्रीडांगण,कर्णिक नगर सोलापूर.







