सोलापूर : आज महानगर पालिका निवडणूकसाठी उमेदवार अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून सकाळी लवकर काही पक्षांनी व अपक्षांनी आपले उमेदवार अर्ज दाखल केले. मात्र दुसरीकडे भाजप व शिंदे सेना यांच्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. अर्धा तास अगोदर भाजपा बी फॉर्म देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी हे नॉर्थकोट प्रशालेत आल्यानंतर भाजपचे बी फर्म घेण्यास सुरवात झाली. मात्र शेवटचे १० मिनिट राहिल्याची घोषणा झाल्यानंतर मोठी धावपळ दिसून आली, यातच अनेक पक्षांच्यावतीने 3 वाजल्या नंतर देखील भाजपचे बी फॉर्म स्वीकारले जात असल्याचे आरोप झाले नंतर हा आरोप निदर्शने आणि ठिय्या आंदोलनाचे स्वरूप घेतले.
या आंदोलनाने तीव्र रूप धारण केले मोठ मोठ्या आवाजात घोषणाबाजी देण्यात आले, अन्याय झाल्याचं आरोप करण्यात आलं. दरम्यान महापालिकेचे आयुक्त ओंबासे पोलिस आयुक्त एम राजकुमार हे येऊन आंदोलन बंद करण्यासाठी मनधरणी करून समजावण्याचे प्रयत्न केले. मात्र आंदोलन शिंदेसेने व काँग्रेस कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. यामुळे आंदोलन शमविण्यात प्रशासनाला कमालीचे अपयश आल्याचे चित्र दिसून आले. गोंधळ मात्र प्रचंड मोठा होता यामध्ये विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्ष शिंदे सेना राष्ट्रवादी ही देखील सामील होते यामध्ये अशोक निंबर्गी मनसेचे महेश इंगळे चेतन नरोटे शिंदे सेनेचे अमोल शिंदे उबाठा चे अजय दासरी रफिक शेख सह अन्य कार्यकर्ते यांनी ठिय्या आंदोलनास बसले आहेत.










