चौथी महाराष्ट्र महिला केसरीचे कार व बुलेट दोन्ही बक्षीसे कोल्हापूरला
सोलापूर ; कोल्हापूरच्या अमृता पुजारीने चौथ्या महिला महाराष्ट्र केसरीचा मान मिळविला. हा मान तिने दुसऱ्यांदा मिळविला. कै. सिद्धराम साखरे यांच्या स्मरणार्थ निर्झरा केअर फाउंडेशनने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर यांच्या सहकार्याने ही स्पर्धा हरिभाई देवकरण मैदानावर आयोजित केली होती. अंतिम लढतीत अमृतास कोल्हापूरच्याच वेदिका ससाणे हीस 7-0 असे हरविताना विशेष प्रयास करावे लागले नाहीत. सहा मिनिटाच्या कुस्तीत अमृताने दोनदा एकेरी पट काढीत गुण मिळविले. अमृताने मध्यंतरासच 5-0 अशी आघाडी घेत तिने विजयाकडे वाटचाल केली होती. वेदिकाला एकही गुण मिळविता आला नाही.
महाराष्ट्र केसरी गटात विजेतीपदाची दावेदार असलेल्या अपेक्षा पाटीलला उपांत्य फेरीतच कोल्हापूरच्या वेदिका ससाणेने 5-0 असा धुव्वा उडवीत पराभवाचा धक्का दिला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात विजेतीपदाचीच दावेदार असलेल्या अमृता पुजारीची कोल्हापूरच्याच सृष्टी भोसले हिस 3-1 असे हरविताना चांगलीच दमछाक झाली. मध्यंतरास अमृताने 1-0 अशी आघाडी घेतली होती. या गटात तृतीय स्थान कोल्हापूरच्या सृष्टी भोसलेने मिळविले. सृष्टीने पुणे जिल्याच्या रोशनी बोडकेचा 6-0 असा पराभव केला.अमृताला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते चांदीचा गदा व कार तर उपविजेती वेदिकाला बुलेट देण्यात आली. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.


सोलापूरची आश्लेषा बागडे 65 किलो गटात सुवर्ण
65 किलो गटात सोलापूरच्या आश्लेषा बागडे हिने सुवर्णपदक पटकाविले. तिने पुणे जिल्ह्याच्या दिव्या कुंभार 11-4 असा पराभव केला. आश्लेषा करमाळा तालुक्यातील अजंनडोह येथील असून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथील विध्यार्थीनी आहे.
पुढील वर्षापासून महिला महाराष्ट्र केसरी
पालकमंत्री गोरे बोलताना म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रतिवर्षी खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा होतात. यासाठी महाराष्ट्र शासन 1 कोटी रुपये खर्च करते. पुढील वर्षापासून महिलांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्ंयाकडून मंजूर करून घेऊ. त्यासाठी 50 लाख रुपयाची तरतूद करण्यात येईल. तसेच चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी 25 लाख रुपयाची मदत त्यांनी जाहीर केली.

या स्पर्धेतील अनुक्रमे अंतिम आणि तृतीय क्रमांकाचे निकाल याप्रमाणे :
72 किलो ः सावरी सातकर (पुणे जिल्हा)विजयी विरुद्ध वेदांतिका पवार (सातारा) 10-4.
गौरी धोटे (अमरावती )विजयी विरुद्धप्रतीक्षा ढमढेरे (पुणे जिल्हा) 5-0
सायली दंडवते ( कोल्हापूर)विजयी विरुद्ध सृष्टी पाटील (सांगली)5-2.
68 किलो ः आकांशा नलावडे(पुणे जिल्हा)विजयी विरुद्ध प्रीती म्हेत्रे (पुणे शहर)10-4
शिवानी मेटकर (कोल्हापूर शहर)विजयी विरुद्ध आशा कांदे (नाशिक) 5-0.
आराधना नाईक (सांगली)विजयी विरुद्ध वैष्णवी धायगुडे (मुंबई उपनगर) 9-5.
65 किलो ः आश्लेषा बागडे (सोलापूर शहर) विजयी विरुद्ध दिव्या कुंभार (पुणे जिल्हा) 11-4.
प्रांजली कुंभार (रायगड) विजयी विरुद्ध ऋतुजा कोळी (सांगली) 5-5.
विशाखा चव्हाण (पुणे जिल्हा) विजयी विरुद्ध अश्विनी गर्जे (बीड) 7-5.
- 62 किलो ः प्रगती गायकवाड (पिंपरी चिंचवड) विजयी विरुद्ध राधिका ढेरे (कोल्हापूर शहर) 10-4.
- श्रखला रत्नपारखी (संभाजीनगर) विजयी विरुद्ध आर्या बाणेकर (पुणे शहर)5-5.
- दाली गुप्ता (ठाणे शहर). संस्कृती शिरसाट(नाशिक शहर) 7-5
59 किलो ः धनश्री फंड (अहिल्यानगर)विजयी विरुद्ध अमेघा घरत (रायगड) 6-5.
प्रिया घरजाळे (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध निर्मिती मुऱ्हे (पिंपरी चिंचवड )5-3.
रोहिणी वीरकर ( सातारा ) विजयी विरुद्ध धनश्री देवकर (पुणे जिल्हा)5-0.
57 किलो ः तन्वी मगदूम (कोल्हापूर जिल्हा) विजयी विरुद्ध सलोनी खोपडे (पुणे जिल्हा) 10-4.
सोनाली दरेकर (अहिल्यानगर) विजयी विरुद्ध ऐश्वर्या नवसे (पुणे शहर) 6-5.
साक्षी मोरे (सातारा) विजयी विरुद्ध भाग्यश्री डुमणे (हिंगोली) 6-5.
55 किलो ः अहिल्या शिंदे (पुणे जिल्हा) विजयी विरुद्ध पूजा पाटील (कोल्हापूर शहर) 16-4.
साक्षी चंदनशिवे(सांगली) विजयी विरुद्ध योगिता सरक (सातारा) 13-4.
समृद्धी नीलवे ( मुंबई उपनगर ) विजयी विरुद्ध अंजली लोंढे ( बीड ) 11-4.
53 किलोः शिवानी करचे (सोलापूर जिल्हा)विजयी विरुद्ध मधुरा वायगंडे (कोल्हापूर शहर) 6-5.
श्रावणी लवटे (कोल्हापूर जिल्हा) विजयी विरुद्ध दिव्या धावडे (अहिल्यानगर) 5-4.
राजनंदिनी रनवरे (सातारा) विजयी विरुद्ध स्नेहल पवार (धाराशिव) 6-3
50 किलो ः आकांशा जाधव (पुणे जिल्हा) विजयी विरुद्ध गौरी पाटील (कोल्हापूर शहर). 11-4.
तृप्ती गुरव (कोल्हापूर जिल्हा) विजयी विरुद्ध भाग्यश्री मासुळे जिल्हा) 10-4
अनुष्का हासपे ( सातारा ) विजयी विरुद्ध अर्पिता गोळे 14-4










