सोलापूर: सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ चे बिगुल वाजल्यापासून शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग क्रमांक २४ च्या भाजप उमेदवार अश्विनी मोहन चव्हाण यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, त्यांना नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

विशेषतः बहूरूपी नगर ते अशोक नगरपर्यंतच्या पट्ट्यात ‘कमळ’ फुलवण्यासाठी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.विविध नगरांमध्ये पदयात्रा आणि भेटीगाठीगेल्या काही दिवसांपासून अश्विनी चव्हाण यांनी प्रभागातील प्रत्येक गल्ली आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा ध्यास घेतला आहे.
बहूरूपी नगर, सुशील नगर आणि भीमाई नगर या भागात काढलेल्या पदयात्रेदरम्यान महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

कमला नगर आणि नेहरू नगर मध्ये झालेल्या कोपरा सभांना तरुणांची मोठी उपस्थिती लाभली होती. “आम्हाला असा प्रतिनिधी हवा आहे जो सुख-दु:खात धावून येईल,” अशी भावना येथील स्थानिकांनी व्यक्त केली. तसेच कोळी समाज बांधवांनी देखील अश्विनी चव्हाण यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवला असून, समाजाच्या विकासासाठी त्या कटिबद्ध राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचा कौलसुंदराम नगर, अमृत नगर आणि अशोक नगर या उच्चभ्रू वस्तीसह मध्यमवर्गीय वस्त्यांमध्येही प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. निरापम सोसायटी आणि माढा कॉलनी मधील ज्येष्ठ नागरिकांनी अश्विनी चव्हाण यांच्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत प्रतिमेचे कौतुक केले. रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर त्यांनी आपल्या प्रचारात भर दिला आहे.
विजयाचा विश्वास प्रचारादरम्यान मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल बोलताना अश्विनी चव्हाण म्हणाल्या की, “जनतेचा हा उस्फूर्त प्रतिसाद पाहून माझा आत्मविश्वास वाढला आहे. केवळ निवडणूक म्हणून नाही, तर या भागाचा कायापालट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. प्रभाग २४ च्या विकासासाठी नागरिकांनी येत्या १५ जानेवारीला ‘कमळ’ या चिन्हासमोरील बटण दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावे.
“मतदान विसरू नका!
तारीख: गुरुवार, १५ जानेवारी २०२६ *
वेळ: सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०६:०० पर्यंत *
उमेदवार: अश्विनी मोहन चव्हाण (अनुक्रमांक १) * चिन्ह: कमळ










