Wednesday, April 1, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूरच्या बालाजी अमाईन्सला रोटरी इंडियाचा ‘बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड’

राजेश भोई by राजेश भोई
November 13, 2025
in सोलापूर शहर
0
सोलापूरच्या बालाजी अमाईन्सला रोटरी इंडियाचा ‘बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड’
0
SHARES
35
VIEWS

सोलापूर ; देशातील उद्योगसमूहांच्या सामाजिक जबाबदारीतील (सीएसआर) उल्लेखनीय योगदानाची दखल घेत रोटरी इंडियाच्या वतीने ‘रोटरी इंडिया नॅशनल सीएसआर अवॉर्ड २०२५’ जाहीर करण्यात आले. होते.या पुरस्कारांमध्ये बालाजी अमाईन्स लिमिटेड, सोलापूर या कंपनीने राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या उद्योगसमूह गटात आरोग्य क्षेत्रासाठी ‘बेस्ट प्रोजेक्ट’ हा पुरस्कार पटकावला आहे. गुरुवारी,नवी दिल्ली येथील माणेकशॉ सेंटर येथे हा पुरस्कार समारंभ पार पडला. रोटरी इंटरनॅशनलचे संचालक के. पी. नागेश यांच्या हस्ते बालाजी अमाईन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष शरत जैन, सचिव मंजू फडके, तसेच रोटरी इंडिया नॅशनल सीएसआर अवॉर्ड समितीचे अध्यक्ष डॉ. शैलेश पालेकर उपस्थित होते.

सोलापूरमधील अलिफॅटिक अमाईन्स आणि स्पेशालिटी केमिकल्स उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळख असलेल्या बालाजी अमाईन्स लिमिटेडने व्यावसायिक यशासोबतच सामाजिक जबाबदारीतही उल्लेखनीय योगदान दिले आहे. विशेषतः आरोग्यसेवा क्षेत्रात कंपनीने राबविलेल्या उपक्रमांमुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोविड काळापासून कंपनीने आरोग्य सेवेच्या बळकटीसाठी सातत्याने काम केले असून, सोलापूर शहरातील तीन रुग्णालयांचे नूतनीकरण करून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या रुग्णालयांमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अत्यल्प किंमतीत अथवा विनामूल्य वैद्यकीय सेवा दिल्या जात आहेत. अत्याधुनिक उपकरणे, सुसज्ज इमारती यांमुळे ही रुग्णालये कोणत्याही कॉर्पोरेट रुग्णालयांच्या तोडीस तोड ठरली आहेत.

या सन्मानाबद्दल बोलताना बालाजी अमाईन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी म्हणाले,कंपन्यांवर सीएसआर ची जबाबदारी कायदेशीररीत्या लागू होण्यापूर्वीच आमच्या व्यवस्थापनाने १९९० च्या दशकात बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवेची पायाभरणी केली होती. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, क्रीडा आणि पर्यावरण या क्षेत्रांमध्ये आम्ही सातत्याने कार्यरत आहोत. चेअरमन ए. प्रताप रेड्डी नेहमी सांगतात की ‘ज्या समाजातून आपण कमावतो, त्यालाच काहीतरी परत द्यावे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे.’ रोटरी इंडियाकडून राष्ट्रीय स्तरावरील हा सन्मान मिळणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. हा पुरस्कार बालाजी अमाईन्स लिमिटेडच्या समाजाभिमुख दृष्टीकोनाचा आणि दीर्घकालीन सामाजिक बांधिलकीचा गौरव असून, कंपनीने आरोग्य, शिक्षण आणि समाजकल्याण क्षेत्रात उभारलेले कार्य इतर उद्योगसमूहांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे ते म्हणाले…

Previous Post

जिल्ह्यातील सोळा हजार नागरिकांची मधुमेहासाठी तपासणी… !

Next Post

भाजपला सोडून रवि गायकवाड वंचित बहुजन आघाडीत..

Related Posts

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान
सोलापूर जिल्हा

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक
सोलापूर जिल्हा

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
Next Post
भाजपला सोडून रवि गायकवाड वंचित बहुजन आघाडीत..

भाजपला सोडून रवि गायकवाड वंचित बहुजन आघाडीत..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025