अक्कलकोट ; मैंदर्गी नगरपरिषदेच्या राजकारणात ऐतिहासिक उलथापालथ होत १३५ वर्षांची स्थानिक गट-तटांची मक्तेदारी उद्ध्वस्त झाली आहे. पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाने नगरपरिषदेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली. नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भाजपाच्या अंजली योगिनाथ बाजारमठ यांनी स्थानिक गटांचे उमेदवार शिवम पोतेनवरू यांचा २४७७ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. अंजली बाजारमठ यांना ५७४३, तर पोतेनवरू यांना ३२६६ मते मिळाली. या निवडणुकीत भाजपाने २० पैकी १८ जागांवर विजय मिळवत स्थानिक गटांचे वर्चस्व पूर्णपणे मोडीत काढले. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने थेट राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत विकासाचा अजेंडा मांडला आणि जनतेने त्यावर निर्णायक शिक्का मारला. नगरपरिषदेवर भगवा फडकताच शहरात जल्लोष झाला. हा विजय मैंदर्गीच्या राजकीय इतिहासातील मैलाचा दगड ठरला आहे.










