सोलापूर: उत्तर सोलापूर तालुक्यातील नायब तहसीलदार चंद्रकांत काशिनाथ हेडगिरी (वय 52) मंडल अधिकाऱ्याचा पगार काढण्यासाठी साठ हजार ची मागणी करून 50 हजार ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना सायंकाळी सातच्या सुमारास रंगेहात पकडले आहे.

विशेष म्हणजे पुण्याच्या अँटी करप्शन विभागाने ही कारवाई केल्याचे समोर आले आहे. त्याना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सदर बाजार पोलीस ठाण्यात चालू केली आहे अशी माहिती पोलीस उपाधीक्षक प्रशांत चौगुले यांनी दिली आहे.








