सोलापूर : माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पुणे येथे भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाची भेट घडवून आणली. मुलांना पुस्तकं भेट देण्यात आली. याचवेळी उपस्थित मुलं पुस्तकात रमल्याचे दिसून आले.मागील काही वर्षांपासून माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार पारदर्शक आणि गतिमान करणारे शिक्षणाधिकारी म्हणून सचिन जगताप यांची वेगळी ओळख आहे. मंगळवार १६ डिसेंबर हा शिक्षणाधिकारी यांचा वाढदिवस. त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

पुणे येथे भरवणवियात आलेल्या पुस्तक महोत्सवात सोलापुरातील विविध शाळेमधून आलेल्या शेकडो मुलांनी भेट दिली. सकाळपासून विद्यार्थी पुस्तकात रमले होते. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्यासह सहाय्यक प्रशासनाधिकारी अनिल जगताप, लिपिक श्रीकांत धोत्रे, अरविंद ताटे, रवीकुमार कोरे, गुरु रेवे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







