सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व सत्ताधारी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केलीये. निवडणुकीमुळे नेत्यांकडून राजीनाम्यांची मालिका देखील सुरू आहे.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेल्या सुधीर खरटमल यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
सुधीर खरटमल यांनी आजच राजीनामा शरद पवार गटाला दिला आहे. राजीनामा पत्र देऊन थेट मुंबईतील अजित पवारांच्या बैठकीला उपस्थिती लावली. या बैठकीतच सुधीर खरटमल यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापूर शहरातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अजित पवारांची ताकद वाढल्याचे बोललं जात आहे. सुधीर खरटमल यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश केला आहे.





दुसरीकडे अहिल्यानगरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहे. एकनाथ शिंदे यांची पारनेरमध्ये जाहीर सभा आहे. या सभेत झावरे शिंदे गटात प्रवेश करतील. सुजित झावरे यांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना साथ दिली होती.







