Thursday, December 18, 2025
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मतदान यंत्रे, मत मोजणी ठिकाणाची केली पाहणी

राजेश भोई by राजेश भोई
December 13, 2025
in सोलापूर शहर
0
आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मतदान यंत्रे, मत मोजणी ठिकाणाची केली पाहणी
0
SHARES
4
VIEWS
सोलापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी महानगरपालिकेकडून तयारीला वेग आला असून आज आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील महत्त्वाच्या मतमोजणी ठिकाणांची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त गिरीष पंडित, नगर अभियंता सारिका आकूलवार, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, ओमप्रकाश वाघमारे, प्रदीप निकते, संदीप भोसले, गणेश कोळी आदी अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी १ ते ८ कार्यालयांची पाहणी,निवडणूक प्रक्रियेचा मुख्य आधार असलेल्या निर्णय अधिकारी कार्यालयांसाठी योग्य जागेची निवड, विजेची सोय, बैठकीची जागा, दस्तऐवज ठेवण्यासाठी सुरक्षित कक्ष, आयटी सुविधा, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचा डॉ.ओम्बासे यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. निर्णय अधिकाऱ्यांना अडचणीविना काम करता यावे यासाठी तत्काळ सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक स्ट्राँग रूमची क्षमता, सीसीटीव्ही कव्हरेज, डबल लॉकिंग सिस्टम, पोलिस बंदोबस्त, नियंत्रण कक्ष, प्रवेश-निर्गम मार्ग, अग्निशमन उपकरणे, 24×7 सुरक्षा या सर्व गोष्टींची आयुक्तांनी सखोल तपासणी करून आवश्यक निर्देश दिले. सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतमोजणी दिवशी मोठी व्यवस्था उभारावी लागणार असल्याने मतमोजणी केंद्रांतील टेबल मांडणी, उमेदवार प्रतिनिधींसाठी स्वतंत्र जागा, मीडिया गॅलरी, आयटी कक्ष, प्रिंटर, वाय-फाय, पोलिस बंदोबस्त, आपत्कालीन व्यवस्था, पार्किंग यांचेही नियोजन आयुक्तांनी पाहून घेतले.

मतमोजणीदरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी योजनेला अधिक काटेकोर करावं, असे त्यांनी सुचवले. नॉर्थकोट प्रशाला, नूमवि प्रशाला, रामवाडी गोदाम आणि सिंहगड कॉलेज येथे पाहणी केली. या ठिकाणी मतदान यंत्रे , मत मोजणी आणि मतदान कर्मचारी कक्ष, मार्गदर्शक फलक,पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रकाशव्यवस्था, जनरेटर, इंटरनेट सुविधा या सर्वांचा बारकाईने आढावा घेतला. प्रत्येक निवडणूक दिनी नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये याकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Previous Post

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

Next Post

मतदान व मतमोजणीच्या दिवशी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश

Related Posts

उपजिल्हाधिकारी पासून ते महसूल कर्मचारी गेले संपावर…
सोलापूर जिल्हा

उपजिल्हाधिकारी पासून ते महसूल कर्मचारी गेले संपावर…

December 17, 2025
मुलं रमली पुस्तकात; शिक्षणाधिकाऱ्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा
सोलापूर जिल्हा

मुलं रमली पुस्तकात; शिक्षणाधिकाऱ्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

December 16, 2025
मी “रेल्वे ब्रिज १९२२” बोलतोय…!
सोलापूर शहर

मी “रेल्वे ब्रिज १९२२” बोलतोय…!

December 15, 2025
मनसेच्या २५ इच्छुकांनी घेतले उमेदवारी अर्ज
राजकारण

मनसेच्या २५ इच्छुकांनी घेतले उमेदवारी अर्ज

December 15, 2025
१५१ विद्यार्थ्यांनी दिली संविधान गौरव परीक्षा..
सोलापूर जिल्हा

१५१ विद्यार्थ्यांनी दिली संविधान गौरव परीक्षा..

December 15, 2025
शिंदे सेना आजपासून इच्छुकांचे अर्ज स्वीकारणार
महाराष्ट्र

शिंदे सेना आजपासून इच्छुकांचे अर्ज स्वीकारणार

December 15, 2025
Next Post
मतदान व मतमोजणीच्या दिवशी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश

मतदान व मतमोजणीच्या दिवशी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025