मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे संविधान दिन निमित्त महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान वाचन व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे संविधानाचे महत्त्व व लोकशाही मूल्यांविषयी प्रभावी जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे संविधान (कायदा) विषयासोबतच कृषी क्षेत्राशी संबंधित जनजागृती देखील करण्यात आली. शाळेच्या परिसरात कायदेविषयक माहितीपर पोस्टर आणि विविध बॅनर्सचे प्रदर्शन लावण्यात आले होते.यावेळी इंग्रजी मराठी हिंदी या तिन्ही भाषेमधून संविधान चे वाचन करून व संविधानाची शपथ घेण्यात आले.
यावेळी डांगे आर एस यांनी मनोगत मांडले यावेळी अध्यक्षीय भाषण च्या माध्यमातून संविधानाचे महत्व बदल प्राचार्य कोळी एस. एल. यांनी विविध मुद्दे, घटना वर्णन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्हनकडे एस. एसी मांडले. तर संपूर्ण कार्यक्रमांचे सूत्रसंचालन चव्हाण एस, डीयांनी प्रभावीपणे केले.
या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून संविधान जनजागृतीसोबतच कृषी विषयातील समज वाढविण्यात या उपक्रमाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच बरोबर विविध शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य कोळी एस.एल., प्राध्यापक वर्ग – व्हनकोडे एस.एस., डांगे आर.एस., कुमठाळे एम.ए., चव्हाण एस.डी., माशाळे एम.एस. यांच्या मार्गदर्शनाबरोबरच झेडेकर, बनसोडे, साठे, सुतार, लोखंडे, मनोज बनसोडे, बागवान, प्रशांत शिरगुर आदी मान्यवर उपस्थित होते.







