मुंबई : केंद्रीय दक्षता आयोगामार्फत देशभरात ‘दक्षता जनजागृती सप्ताह-२०२५’ दिनांक २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या आठवड्याचे उद्दिष्ट प्रशासनामध्ये पारदर्शकता, प्रामाणिकता आणि जबाबदारीची भावना वृद्धिंगत करणे हे आहे.
या पार्श्वभूमीवर अपर पोलीस आयुक्त (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) संदीप दिवाण यांनी नागरिक तसेच शासकीय व खाजगी क्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी यांना भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत सक्रिय सहभागाचे आवाहन केले आहे.

कोणताही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना अथवा भ्रष्टाचारात सहभागी असल्याचे आढळल्यास, नागरिकांनी त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, मुंबई येथे संपर्क साधावा.
- संपर्कासाठी पुढील माध्यमे उपलब्ध आहेत :
- 📞 दूरध्वनी क्रमांक: 24921212
- 📞 टोल फ्री क्रमांक: 1064
- 📱 व्हॉट्सअॅप क्रमांक: 8828241064
- ✉️ ईमेल: addicpacbmumbai@mahapolice.gov.in
संदीप दिवाण यांनी सांगितले की, “भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य अत्यावश्यक आहे. पारदर्शकतेकडे वाटचाल ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”







