सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेने ‘सेवाकर्मी प्लस’ प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये मोठी झेप घेतली असून, या माध्यमातून जिल्हा परिषदेचे प्रशासन अत्यंत गतिमान आणि पारदर्शक झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुलदीप जंगम यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेने केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

प्रशासनात ‘सेवाकर्मी प्लस’ची उत्तुंग भरारी: शासकीय कामात सुसूत्रता आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींचा निपटारा वेगाने व्हावा यासाठी ‘सेवाकर्मी प्लस’ प्रणाली राबवण्यात येत आहे. कुलदीप जंगम यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रलंबित फायलींचा निपटारा आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यावर भर दिला आहे. त्यांच्या या विशेष प्रयत्नांमुळे सोलापूर जिल्हा परिषदेने या प्रणालीत ‘उत्तुंग भरारी’ घेतली असून प्रशासन अधिक लोकभिमुख झाले आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार: या यशस्वी कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील व इतर विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते










