सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक २६ मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दीपक जमादार यांचा प्रचार दौरा उत्साहात पार पडला.

आज त्यांनी प्रभागातील द्वारका नगर, उद्धव नगर, रोहिणी नगर आणि कृष्णा कॉलनी या भागांना भेट देऊन नागरिकांशी थेट संवाद साधला.या दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. महिलांनी त्यांचे औक्षण केले, तर तरुणांनी मोठ्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. दीपक जमादार यांनी या भागातील मूलभूत समस्या जाणून घेतल्या आणि प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.”सर्वसामान्य जनतेचा विकास आणि प्रभागाचा कायापालट हेच माझे मुख्य ध्येय आहे,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, दीपक जमादार यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाल्याचे दिसून येत आहे.











