सोलापूर: सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा गौरवपूर्ण सत्कार आणि निरोप समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. पोलीस आयुक्त मा. एम. राजकुमार यांच्या हस्ते या सर्व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात, निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दीर्घ आणि निष्कलंक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी यावेळी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या पुढील आरोग्यदायी व सुखद सेवानिवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात पोलीस उपायुक्त गौहर हसन,पोलीस , विजय कबाडे, पोलीस उपायुक्त डॉ.अश्विनी पाटील यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या सहकाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेच्या आठवणींना उजाळा दिला. पोलीस दलात दिलेल्या प्रदीर्घ सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. आपल्या कुटुंबासमवेत उपस्थित असलेल्या या अधिकाऱ्यांसाठी हा क्षण अत्यंत भावूक आणि सन्मानाचा ठरला.













