सोलापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात संगणक कमी असल्यामुळे कामे संथगतीने होत होती. त्यामुळे बार्शी येथील सासुरे गावातील जगदंबा उत्कर्ष फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून माध्यमिक शिक्षण विभागाला पाच संगणक, एक प्रिंटर, एक स्कॅनर भेट देण्यात आले. त्यामुळे आता माध्यमिक शिक्षण विभागाची कामे गतीने होणार आहेत.
जगदंबा फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. अजयकुमार करंडे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची भेट झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाला संगणक द्यावे, अशी विनंती सचिन जगताप यांनी केली होती. त्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन हे साहित्य शुक्रवारी सायंकाळी दिले.


यावेळी उपशिक्षणाधिकारी सुरेश वाघमारे, अनिल बनसोडे, विठ्ठल डेपे, प्रशासन अधिकारी अनिल जगताप, लिपीक अनिल पाटील, रवी कोरे, श्रीकांत धोत्रे, अरविंद ताटे, गुरूपादप्पा रेवे , राजू शेख, प्रभाकर राजगुरू, मनोज साबळे, फिरोज शेख, तसेच तात्यासाहेब करंडे, रामचंद्र आवारे, प्रशांत भारती, बापूसाहेब नेमाने आदी उपस्थित होते. साहित्य मिळाल्याने कामे सुलभ होणार आहेत अशी माहिती शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी माहिती दिली आहे..







