Wednesday, April 1, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन

राजेश भोई by राजेश भोई
November 13, 2025
in सोलापूर जिल्हा
0
माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन
0
SHARES
30
VIEWS

सोलापूर:- अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते पोलादी पुरुष आणि सहकारातील खंबीर नेतृत्व सिद्रामप्पा पाटील यांची गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने सोलापुरातील खाजगी रुग्णालयात प्राणज्योत मालवली वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानं अक्कलकोट तालुक्यासह राजकीय सामाजिक अन सहकार क्षेत्रात शोककळा पसरली त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अक्कलकोट तालुक्यातील कुमठे इथं शुक्रवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सिद्रामप्पा पाटील यांच्या निधनाचं वृत्त समजताच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली सिद्रामप्पा पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत मोठा संघर्ष उभा करून अक्कलकोट तालुक्यात भाजपाची बांधणी केली इतकच नाही तर तालुका भाजपामय केला सहकार क्षेत्रातील त्यांचं कार्य हे सामान्यजन आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारं मोठा आधार देणारं होतं शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन आयुष्यभर त्यांच्यासाठी झटणारं एक खंबीर नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं अशी भावना व्यक्त करण्यात आली

गावच्या सरपंचपदापासून पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा बँकेचे सलग ३५ वर्षे संचालक एकवेळ उपाध्यक्ष तसंच श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मार्केट कमिटी सभापती तालुक्याचे आमदार असा सिद्रामप्पा पाटील यांचा कर्तृत्ववान राजकीय प्रवास राहिला इन सोलापूर न्यूज चॅनल चे ते मार्गदर्शक होते अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला या दरम्यान अनेक दिग्गज नेत्यांशी सिद्रामप्पा पाटील यांची जवळीक राहिली भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात वयाच्या ८७ व्या वर्षापर्यंत सिद्रामप्पा पाटील यांचं राजकीय आणि सामाजिक कार्य अखंड पणे सुरु होत गेल्या काही दिवसापासून त्यांना आजाराने ग्रासलं होतं दरम्यान सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु असताना रात्री ८ वाजून १७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

अक्कलकोट तालुका आणि सिद्रामप्पा पाटील असं कायमच एक अतूट नातं राहील इथल्या शेती आणि शेतकऱ्यांसाठी कायमच त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली प्रसंगी लढा उभारला शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून पर्याय उपलब्ध करून दिला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी यांना दिलासा देण्याची त्यांची भूमिका राहिली तालुक्यातील बाजार समितीचा विकास साध्य करताना सिद्रामप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतीमालाला योग्य भाव आणि सुविधा निर्माण करून देण्याचं भरीव कार्य याचा उल्लेख महत्वाचा ठरतो लोकहितकारी समाजकारण आणि राजकारणामुळं कायमच त्यांना मोठं जनसमर्थन मिळालं शेती सहकार यासह शैक्षणिक क्षेत्रासाठी देखील सिद्रामप्पा पाटील यांचं मोलाचं योगदान राहील अनेक शैक्षणिक संस्थांचे ते आधारवड होते

सिद्रामप्पा पाटील यांनी अक्कलकोट तालुक्यात भाजपाची बांधणी करताना पक्षाला सत्तेपर्यंत नेलं हा काळ त्यांच्यासाठी संघर्षाचा राहिला मात्र कोणत्याही परिस्थितीत न डगमगता खंबीरपणे त्यांनी तालुक्याचं नेतृत्व केलं यामुळं पोलादी पुरुष अशी त्यांची ओळख निर्माण झाली राजकीय जीवनात त्यांच्यावर हल्ल्याचे देखील प्रकार घडले पण ते परतवून लावताना त्यांचा निडर पणा देखील तालुक्याने अनुभवला ज्येष्ठ नेते शरद पवार ,स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ,नितीन गडकरी , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले त्यांच्या निधनानं राजकीय सामाजिक सह कृषी ,सहकार ,शैक्षणिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली

Previous Post

१६ नोव्हेंबरला लोकमंगलचा ४६ सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडणार

Next Post

जिल्ह्यातील सोळा हजार नागरिकांची मधुमेहासाठी तपासणी… !

Related Posts

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान
सोलापूर जिल्हा

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक
सोलापूर जिल्हा

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
Next Post
जिल्ह्यातील सोळा हजार नागरिकांची मधुमेहासाठी तपासणी… !

जिल्ह्यातील सोळा हजार नागरिकांची मधुमेहासाठी तपासणी… !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025