सोलापूर: सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य व जिल्हा अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान (पुणे), रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाईट आणि रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक २७ आणि २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत जिल्हा रुग्णालय, गुरुनानक चौक, सोलापूर. येथे पार पडणार आहे.
या उपक्रमाला आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. यामध्ये डॉ. संतोष नवले (जिल्हा आरोग्य अधिकारी, सोलापूर), डॉ. वर्षा डोईफोडे (जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर), डॉ. भगवान पवार (उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ) आणि कुलदीप जंगम (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर) यांचा समावेश आहे. रोटरी क्लबचा पुढाकाराने या सामाजिक कार्यासाठी रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाईटचे अध्यक्ष रो. बालमुकुंद राठी व सचिव रो. रोशन भुतडा, तसेच रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे अध्यक्ष रो. विक्रम बंडेवार व सचिव रो. प्रमोद देशपांडे आणि त्यांचे सर्व सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत.
ज्या नागरिकांना मोतीबिंदू किंवा अन्य नेत्रविकारांच्या शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. शिबिरात सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.नाव नोंदणीकरण्यासाठी संपर्क: ८४२१२ २४२४३ \ 84212 24243










