चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी लॅसिक उपचारावर २०% सवलत
सोलापूर: प्रधान चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने २६ जानेवारी २०२५ रोजी ‘मोफत लॅसिक लेसर तपासणी शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. १८ ते ४० वर्षे वयोगटातील ज्या व्यक्तींना चष्म्याचा नंबर कायमचा घालवायचा आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना लॅसिक लेसरच्या अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे तपासणी केली जाईल. विशेष म्हणजे, शिबिरात निवड झालेल्या व्यक्तींना लॅसिकपूर्व तपासणी (टोपोग्राफी) व लॅसिक उपचारावर २०% सवलत दिली जाणार आहे. रुग्णालयाने लॅसिक लेसरचे नवीन तंत्रज्ञान व सॉफ्टवेअर अपडेट केले असून, यामुळे ट्रीटमेंटची अचूकता आणि सुरक्षितता अधिक वाढली आहे. या शिबिरात नेत्रतज्ज्ञ डॉ. उमा राजीव प्रधान, डॉ. विराज राजीव प्रधान आणि डॉ. स्वाती विराज प्रधान रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क व नोंदणीसाठी इच्छूक नागरिकांनी अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी ०२१७-२५५२९०८, ९८८१००४३०४ किंवा ७०५८६५९३४२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

शिबिराचा तपशील:
दिनांक: २६ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.००
स्थळ: प्रधान नेत्र रुग्णालय व लॅसिक लेसर सेंटर, ५०, रेल्वे लाईन्स, डॉ. एम. जी. प्रधान मार्ग, सोलापूर












