Monday, April 13, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

१२ हजारांसाठी सरकारी कार्यालयाचा ‘अंधार’; उत्तर सोलापूर भूमी अभिलेखची वीज कापली!

राजेश भोई by राजेश भोई
April 13, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
१२ हजारांसाठी सरकारी कार्यालयाचा ‘अंधार’; उत्तर सोलापूर भूमी अभिलेखची वीज कापली!
0
SHARES
47
VIEWS

सोलापूर: जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उत्तर सोलापूर भूमी अभिलेख कार्यालयाचा वीजपुरवठा केवळ १२ हजार रुपयांच्या थकबाकीपोटी गेल्या आठ दिवसांपासून खंडित करण्यात आला आहे. महावितरणच्या या कारवाईमुळे कार्यालयातील संगणकीय कामे ठप्प झाली असून, ऐन उन्हाळ्यात कर्मचारी आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

उत्तर सोलापूर भूमी अभिलेख कार्यालय हे पहिल्या मजल्यावर आहे. गेल्या आठ दिवसांपासून वीज नसल्याने पंखे आणि दिवे बंद आहेत. सोलापूरचा पारा ४० अंशांच्या वर असताना, पहिल्या मजल्यावरील कर्मचारी घामाच्या धारांमध्ये काम करत असल्याचे चित्र आहे. अंधारामुळे आणि उष्णतेमुळे कार्यालयात बसणे कठीण झाले आहे.

उत्तर सोलापूर कार्यालयाची वीज कापल्यानंतर, प्रशासनाने तात्पुरती सोय म्हणून खालच्या मजल्यावर असलेल्या दक्षिण सोलापूर भूमी अभिलेख कार्यालयातून वीज जोडून घेतली आहे. मात्र, या एका कनेक्शनवर सर्व भार येत नसल्याने अनेक मर्यादा येत आहेत. कार्यालयातील महत्त्वाची संगणकीय कामे आणि सर्व्हर वीज नसल्याने प्रभावित झाले आहेत. तातडीच्या कामांसाठी कर्मचाऱ्यांना बाहेरून खाजगी दुकानातून प्रिंट काढून आणाव्या लागत आहेत. यामुळे शासकीय कामाची गोपनियता आणि गती यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जमिनीचे उतारे, नकाशे आणि इतर कामांसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे. “एकीकडे सरकार डिजिटल व्यवहाराच्या गप्पा मारते, तर दुसरीकडे अवघ्या १२ हजारांसाठी सरकारी कार्यालयाची वीज कापली जाते, ही खेदजनक बाब आहे,” अशी भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केली आहे. आता या प्रकरणावर वरिष्ठ प्रशासन काय तोडगा काढते आणि ही थकबाकी भरून वीजपुरवठा कधी पूर्ववत होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Previous Post

महात्मा फुलेंचे विचार आजही सर्वांना दिशादर्शक : विक्रम सोनवणे

Next Post

भंडारकवठे लोकमंगल साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक; सहा महिने उलटले तरी ऊस बिले मिळेना!

Related Posts

भंडारकवठे लोकमंगल साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक; सहा महिने उलटले तरी ऊस बिले मिळेना!
सोलापूर जिल्हा

आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या नियोजनाखाली सोलापुरात ‘महा-आरोग्य’ शिबिर यशस्वी.
सोलापूर जिल्हा

आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या नियोजनाखाली सोलापुरात ‘महा-आरोग्य’ शिबिर यशस्वी.

April 13, 2026
वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खांदेपालट; संजय देशमुख यांच्याकडे नवा पदभार.
सोलापूर जिल्हा

वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खांदेपालट; संजय देशमुख यांच्याकडे नवा पदभार.

April 11, 2026
चैन स्नॅचिंगचा गुन्हा ४८ तासांत उघड; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक
सोलापूर शहर

चैन स्नॅचिंगचा गुन्हा ४८ तासांत उघड; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक

April 11, 2026
“न्यायदेवतेच्या दरबारात सोलापूरचा डंका! JMFC परीक्षेत प्रथमेश शिंदे यांचे देदीप्यमान यश; वकील वर्गात आनंदाचे वातावरण.”
सोलापूर जिल्हा

“न्यायदेवतेच्या दरबारात सोलापूरचा डंका! JMFC परीक्षेत प्रथमेश शिंदे यांचे देदीप्यमान यश; वकील वर्गात आनंदाचे वातावरण.”

April 10, 2026
Next Post
भंडारकवठे लोकमंगल साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक; सहा महिने उलटले तरी ऊस बिले मिळेना!

भंडारकवठे लोकमंगल साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक; सहा महिने उलटले तरी ऊस बिले मिळेना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भंडारकवठे लोकमंगल साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक; सहा महिने उलटले तरी ऊस बिले मिळेना!

भंडारकवठे लोकमंगल साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक; सहा महिने उलटले तरी ऊस बिले मिळेना!

April 13, 2026
१२ हजारांसाठी सरकारी कार्यालयाचा ‘अंधार’; उत्तर सोलापूर भूमी अभिलेखची वीज कापली!

१२ हजारांसाठी सरकारी कार्यालयाचा ‘अंधार’; उत्तर सोलापूर भूमी अभिलेखची वीज कापली!

April 13, 2026
महात्मा फुलेंचे विचार आजही सर्वांना दिशादर्शक : विक्रम सोनवणे

महात्मा फुलेंचे विचार आजही सर्वांना दिशादर्शक : विक्रम सोनवणे

April 13, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025