सोलापूर : मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कौतुक केले. मंगळवारी, जिल्हा परिषदेत आल्यानंतर गोरे यांनी मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अमोल जाधव यांच्यासह अभियान कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत जिल्ह्यात राज्य स्तरावरून विविध सेलिब्रिटी, कीर्तनकार यांच्या प्रभावी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचाही आढावा घेतला. प्रारंभी अतिरिक्त सीईओ कोहिनकर यांनी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या अभियानासाठी समाज माध्यमाचा प्रभावी वापर व ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेले कामाचे प्रेझेंटेशन उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त सीईओ कोहिनकर यांच्यासह विभागप्रमुख व गटविकास अधिकारी प्रत्येक गावास भेट देऊन मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या कामांना गती देत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. यावेळी जनसंपर्क अधिकारी सचिन जाधव, अधीक्षक सुहास चेळेकर, कक्ष अधिकारी सिध्दाराम बोरूटे, अक्षय स्वामी, अधीक्षक आप्पा भोसले, अभिनव पायंडे उपस्थित होते.











