सोलापूर : स्व. विष्णुपंत तात्या कोठे प्रतिष्ठानच्यावतीने बुधवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी स्व. विष्णूपंत तात्या कोठे प्रतिष्ठानच्या वतीने २६ नोव्हेंबरला सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून, या सर्व विवाह सोहळ्याच्या नियोजना संदर्भात १८ नोव्हेंबर रोजी आ. देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. गतवर्षीपेक्षा हा सोहळा अतिशय देखणा करण्याचे ठरले असल्याची माहिती आ. देवेंद्र कोठे यांनी दिली.
सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचे हे दुसरे वर्ष आहे. याही वर्षी हा सोहळा अतिशय दिमाखदार व शिस्तबद्ध पार पाडावा याकरिता आजच्या बैठकीत आ. देवेंद्र कोठे यांनी उपस्थितांशी चर्चा केली आणि मार्गदर्शनही केले. यावेळी प्रामुख्याने अविनाश महागावकर यांनीही या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, गतवर्षी आयोजनाचे पहिलेच वर्ष असताना देखील ज्या पद्धतीने कोठे प्रतिष्ठानच्यावतीने विवाह सोहळा पार पडण्यात आला; तितके व्यवस्थित नियोजन क्वचितच इतरत्र पाहायला मिळते अशा शब्दात त्यांनी व्यवस्थापनाचा गौरव केला. चांगल्या कार्याला उत्तम करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा संकल्प देखील यावेळी मांडण्यात आला.
या बैठकीस भाजपा माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक प्रथमेश महेश कोठे, भाजपा शहर सरचिटणीस सुधाताई अळ्ळीमोरे, मोनिका कोठे, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, माजी नगरसेवक अनिल पल्ली, सुनिताताई कामठी, विठ्ठल कोटा, मेघनाथ येमुल, कुमुद अंकाराम, सारिका सुरवसे, शशिकांत कैंची, बिज्जू प्रधाने, रवी कोळेकर यांच्यासह भाजपाचे मंडल अध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, कोठे परिवारावर प्रेम करणारे प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.







