औरंगाबादकर सराफ पेढीतर्फे मोत्यांचे प्रदर्शन
सोलापूर,- नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला स्त्री सौंदर्यात भर घालणाऱ्या औरंगाबादकर सराफी पेढीने मोत्यांच्या दागिन्यांचा नजराणा नव्या वर्षाच्या प्रारंभानिमित्त सादर करून स्त्री सौंदर्याच्या आविष्कारांची जणू ओटीच भरली आहे, असे सांगण्यात आले.गुरुवारी, हॉटेल ऐश्वर्या येथे मोत्यांच्या दागिन्यांच्या प्रदर्शनाच्या शुभारंभ प्रसंगी भारतातील विविध प्रांतातले दागिने येथे एकत्र बघायला मिळाले असे त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रिसिजनच्या सुहासिनी शहा या होत्या.अस्सल मोती आणि रत्ने म्हटले की, ग्राहकांच्या तोंडी नाव येते ते १७८ वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या औरंगाबादकर सराफांचेच, असे वक्त्यांनी सांगितले.
यावेळी सुमारे ३०० वर्षांचा इतिहास असलेल्या मराठमोळ्या मोत्यांच्या दागिन्यांची थीम यावेळी साकारून यंदा पारंपरिक दागिने प्रामुख्याने उपलब्ध केले आहे.मराठमोळ्या दागिन्यांत यावेळी वज्रटिक, चिंचपेटी, मोत्याचा लफ्फा, तन्मणी, पेंड, बाजीराव नथ, पारंपरिक नथ, बानू नथ, वेल, झुब्बा, शबाना, कॉलर, रामराज तोडे, कंगन, फुलतोडा, राणीहार चोकर, साज, पुतळी हार, ठुशी, गरसळी, मोत्यांच्या कुड्या, बुगडी, वाकी, बाजूबंद आदी व्हरायटी उपलब्ध आहेत.काळानुसार होणाऱ्या बदलांची नोंद घेऊन त्यानुसार नव्या डिझाइनचे दागिने सुध्दा इथे उपलब्ध करून देत आहेत.

हे प्रदर्शन 1 जानेवारी ते 7 जानेवारी पर्यंत हॉटेल ऐश्वर्या येथे सर्वांसाठी खुले आहे. प्रारंभी मोहन वैद्य यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी संजय औरंगाबादकर, श्रेया औरंगाबादकर, सुवर्णा औरंगाबादकर, मीना औरंगाबादकर, भुवनेश्वर औरंगाबादकर, पद्मा कुलकर्णी, माधव देशपांडे, आदी उपस्थित होते.










