सोलापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर कार्य करणाऱ्या लोकराजा फाउंडेशनच्या या सामाजिक संस्थेमार्फत मनपा डिजिटल स्कूल 28, विजापूर रोड येथील सुंदरम नगर येथे बालदिनाचे औचित साधून विद्यार्थ्यांन सोबत केक कापुन व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी लोकराजा फाउंडेशन तर्फे शाळेस टॉय कार व स्पोर्ट्सचे साहित्य भेट देण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक सुतार यांनी संस्थेचे आभार मानले. या कार्यक्रमास लोकराजा फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे, सचिव सागर लोंढे, रंजना साखरे, मयुरी भुजबळ, डाॅ.मयुर बेडागनुर,डॉ कल्पेश रणदिवे, डाॅ.असिफ कोटनाळ, डाॅ. सिद्धार्थ पाटील, डाॅ. रंजीत बोबडे,डॉ.सुशील घोणसे, माधुरी इंगळे, समृद्धी उंबरे यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक, संस्थेचे सदस्य व शालेय कर्मचारी उपस्थित होते.







