सोलापूर : श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित, संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) व संगमेश्वर रात्र महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग तसेच सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. प्रा. डॉ. चंद्रकांत भानुमते स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान सोमवार, ५ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता संगमेश्वर कॉलेज येथील बी बिल्डिंग, बी-१ सभागृहात होणार आहे.

या स्मृती व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे (अधिष्ठाता, मानवविद्या शाखा, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा) उपस्थित राहणार आहेत. ते ‘भारतीय शेती समोरील बदलती आव्हाने’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. सदर व्याख्यानास प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व अर्थशास्त्र विषयाचे अभ्यासक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.











