सोलापूर : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५ रोजी लोकमंगल कारखान्याचे सर्वेसर्वा सतीशदादा देशमुख, अध्यक्ष महेश देशमुख, संचालक पराग पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी सर्व कर्मचाऱ्यांना संबोधताना महेश देशमुख म्हणाले की, भंडारकवठे कारखान्यानी नेहमीच संयम व शिस्तपद्धत पद्धतीने यशस्वीरित्या विक्रमी गाळप करून दाखविलेले आहे, कितीही अडचणी आल्या तरी सर्वांनी आपले योगदान नेहमीच दिले आहे, येणारा गळीत हंगाम हा कारखान्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे, सर्व कर्मचाऱ्यांनी एकदिलाने आपल्या विभागाची कामे पूर्ण करून कारखाना गाळपास सज्ज करावे. यंदाच्या वर्षी सर्वात जास्त गाळप करून मागील सर्व विक्रम मोडून काढीत आपल्याला 10 लाख मे. टन गाळप करावयाचे आहे. त्याकरिता पुरेपूर ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा गाळप करणेकरिता सज्ज आहे. सर्व ऊस उत्पादकांची देय अदा केलेली आहेत, ऊस उत्पादक शेतकऱ्याकरिता आयोजित शिवारफेरी या कार्यक्रमांतर्गत ऊस उत्पादकांचा कल हा लोकमंगल कारखान्यासच ऊस घालण्याचा आहे. कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ समाधानकारक व वेतन दरमहा नियमित केलेले आहे. यंदाच्या वर्षी पाऊस देखील चांगला झालेला आहे, ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. तरी सर्वांनी गळीत हंगाम यशस्वी करण्याकरिता शर्तीचे प्रयत्न करावे, व्यवस्थापन सदैव आपल्या पाठीशी भक्कम पणे उभी आहे.


बॉयलर पुजननंतर सर्व ऊस तोडणी वाहतूक ठेकादार बांधवांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्यात संबोधताना दादासाहेब यांनी लोकमंगल साखर कारखाना हा दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी कटीबद्ध आहे, मी स्वतः आणि बंधू मा आ. बापूसाहेबांचा ह्या भागावर विशेष प्रेम आहे, ऊस तोडणी यंत्रनेने आजवर जो विश्वास दर्शवीला आहे त्यास कदापि तडा जाऊ दिला जाणार नाही. आपण सर्वांनी योगदान दिले तर नक्कीच आपण विक्रमी गाळप करणार आहोत, शेतकरी, ऊस तोडणी यंत्रणा आणि कर्मचारी ह्याचा हा कारखाना आहे. याप्रसंगी सरव्यवस्थापक टेकनिकल रुद्रमठ, सरव्यवस्थापक गुणांनसेकरण, सहा सरव्यवस्थापक दीपक नलावडे, आदी विभागप्रमुख व कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.








