सोलापूर : लोकराजा अभ्यासिकेच्यावतीने तुळजापूर तालुक्यातील हगलूर येथील संस्कार संजीवनी अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. वंचितांना व त्यांच्या मुलांना दिवाळी फराळ, फटाक्याशिवाय दिवाळी साजरी करावी लागते. मात्र तुळजापुरातील संस्कार संजीवनी अनाथ आश्रमातील काळे दाम्पत्यांनी सुरू केलेल्या बालकाश्रमामुळे या वंचित घटकांच्या मुलांची दिवाळी गोड करण्यात आली.


हगलूर येथे गुरुवारी सायंकाळी लोकराजा अभ्यासिका केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आशुतोष तोंडसे यांनी संस्कार संजीवनी बालकाश्रमास भेट देऊन आश्रमातील मुला, मुली सोबत दिवाळी साजरा केली व त्यांची दिवाळी गोड केली. एवढेच नव्हे तर याप्रसंगी अनाथ विद्यार्थ्यांसोबत केक कापून दिवाळी साजरी करण्यात आली. व त्यांना दिवाळीसाठी लागणारे वस्तू, कपडे, फराळ देण्यात आले.. याप्रसंगी लोकराजा अभ्यासिकेचे संस्थापक आशुतोष तोंडसे यांच्यासह अभ्यासिका केंद्रातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनि उपस्थित होते.







