सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधून निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या उच्चविद्याविभूषित नगरसेविका मृण्मयी महादेव गवळी हिने वयाच्या २५ व्या वर्षी सोलापूर महानगरपालिकेत सर्वात कमी वयाच्या नगरसेविका होण्याचा मान मिळविला आहे. गवळी वस्ती तालीम संघाचे संस्थापक महादेव गवळी यांची मृण्मयी ही कन्या आहे. सोलापूर विद्यापीठामध्ये लेक्चरर आहे.

भाषेवर वक्तृत्व आणि महिलांच्या प्रश्नांची जाण असलेल्या नगरसेविका म्हणून मृण्मयी गवळी या सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका म्हणून कामकाज पाहणार आहोत.










