सोलापूर : सोलापूर महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025/26 च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले. तब्बल नऊ वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीत प्रथमच भारतीय जनता पार्टीने 102 जागेवर उमेदवार उभे करून मोठ्या ताकतीने ही निवडणूक लढवली होती.

सोलापुरातील मतदारांनी भाजपाच्या पारड्यात मतदान रूपी भरभरून आशीर्वाद दिले या निवडणुकीत तब्बल 87 भाजपाचे नगरसेवक निवडून आले नगरसेवक निवडून आल्यानंतर संपूर्ण सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले होते की भाजपाच्या गटनेतेपदी कोणाची वर्णी लागणार प्रत्येक इच्छुक आपापल्या गॉडफादर मार्फत या पदासाठी आपली वर्णी लागावी म्हणून शर्तीचे प्रयत्न करताना दिसून आले परंतु भारतीय जनता पार्टीने तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर व तिनही आमदारांच्या तसेच सर्व नगरसेवकांच्या वतीनं या पदासाठी नरेंद्र काळे यांची निवड करण्यात आली ही निवड करताना नरेंद्र काळे यांनी विरोधी पक्ष नेता असताना केलेले काम शहराध्यक्ष असताना पक्ष बांधणीसाठी केलेले कार्य व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची असलेली कसब या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून पक्षश्रेष्ठींनी भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड केली आहे.









