सोलापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तसेच सोलापूर महापालिक निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या सुचनेनुसार कृषी मंत्री तथा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे हे मंगळवार २१ ऑक्टोबर रोजी दुपारी सोलापूर शहर दौऱ्यावर येत आहेत. सोलापूर शहरातील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते यांच्याशी बैठक घेऊन संवाद साधणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यासाठी भरणे यांची पक्षाच्या वतीने संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे आगमी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीच्या अनुषंगाने आता ते सातत्याने सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. निवड झाल्यानंतर ते आता पहिल्यांदा सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या बैठकीत पक्षाचा आढावा घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकी संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. तरी पक्षाचे जेष्ठ नेते प्रांतिक पदाधिकारी सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष तसेच शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापुर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केले.







