सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीवर प्रेरित होऊन लोककल्याणासाठी सतत कार्यरत आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचे गतिमान चक्र सुरू ठेवण्यासाठी अतुलनीय योगदान देणारे तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या राज्याला सक्षम करणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीने महापालिका आवारातील स्व यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्यास राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले अमर रहे अमर रहे यशवंतराव चव्हाण अमर रहे च्या घोषणा देत आदरांजली वाहण्यात आली
याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे महीला अध्यक्ष संगीताताई जोगदनकर प्रदेश सचिव इरफान शेख ओबीसीं प्रदेश उपाध्यक्ष बसवराज बगले नगरसेवक गणेश पुजारी जेष्ठ नेते हेमंत चौधरी नगरसेवक नुतन गायकवाड अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख व्ही जे एन टी अध्यक्ष रुपेश भोसले सहकार सेल अध्यक्ष भास्कर आडकी सोशल मिडीया अध्यक्ष वैभव गंगणे जेष्ठ नागरिक अध्यक्ष भारत साबळे दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे प्रविन वाडे सुरेखा घाडगे मकबूल मुल्ला शक्ती कटकधोड ,सुर्यकांत शेरखाने सुनील इंगळे ,ज्ञानेश्वर सोनवणे रामप्रसाद शागालोलु आदी उपस्थित होते








