सोलापूर : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सोलापूर महापालिकेच्या वतीने ३ डिसेंबर रोजी विशेष फिजिओथेरपी सेवा व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेचे भौतिकोपचार केंद्र, जोडबसवण्णा चौक, मनपा शाळा क्रमांक ६, सुधीर गॅस एजन्सी मागे या ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरामध्ये दिव्यांग व्यक्तींना फिजिओथेरपी तज्ञांकडून संपूर्ण वैद्यकीय तपासणी, शारीरिक स्थितीचे मूल्यमापन, आवश्यक त्या थेरपीचे मार्गदर्शन, तसेच वेदनानियंत्रण, व्यायाम पद्धती, पुनर्वसन, हालचाल सुधारण्यासाठी उपाय योजना याबाबत सविस्तर सल्ला दिला जाणार आहे. शिबिरासाठी अनुभवी फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत. सर्व दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
