सोलापूर । जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक दोन मर्यादित या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सलग चौथ्यांदा सत्ताधारी कर्मचारी विकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यांचे सर्व १५ उमेदवार निवडून आले. प्रदीप सकट तर बिनविरोध विजयी झाले. विरोधी सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. ३० नोव्हेंबर रोजी पंचायत समिती उत्तर सोलापूर येथे मतदान झाले. एकूण २६३ पैकी २२४ मतदारांनी हक्क बजावला. सायंकाळी मतमोजणीही करण्यात आली. निवडणूक अधिकारी विजय वडेट्टीकर होते.


विजयी १५ उमेदवार सर्वसाधारण मतदारसंघ-गिरीश जाधव, सुधाकर माने देशमुख, श्रीकांत धोत्रे, श्रीकृष्ण घंटे, शशिकांत साळुंखे, यादव मोहन, अंकुश कोळेकर, दिनेश बनसोडे, समीर शेख, भीमाशंकर वाले. भटक्या विमुक्त मतदार संघातून रणजित घोडके, ओबीसी मतदारसंघातून शिवाजी कांबळे, महिला मतदारसंघातून राणी सुतार, संगीता हंडे विजयी झाल्या. तर प्रदीप सकट हे बिनविरोध निवडून आले.

