सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सातव्यांदा दैनिक संचारचे पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी महेश पवार,नितीन वारे,गिरमल्ला गुरव, अशोक सोनकंटले यांची तर सचिवपदी बालाजी वाघे, यांची निवड करण्यात आली आहे. दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे वार्षिक सर्वसाधारण बैठक मंद्रूप येथे मंगळवारी पत्रकार संघटनेचे सल्लागार अमोगसिध्द लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
यावेळी उपस्थित पत्रकारांनी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांचे कार्य कौतुकास्पद असून पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सातव्यांदा त्यांची च फेरनिवड निवड करावे अशी एकमुखी मागणी केली. तेव्हा एकमताने पंचाक्षरी स्वामी यांची दक्षिण सोलापूर पत्रकार संघटनेचे अध्यक्षपदी सातव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी नूतन अध्यक्ष स्वामी व सर्व पदाधिकाऱ्यांचा ज्येष्ठ पत्रकार अमोगसिध्द लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी म्हणाले,येणाऱ्या काळामध्ये पत्रकार संघासाठी कार्यालय आणि पत्रकार बांधवासाठी गृहनिर्माण संस्था आणि आरोग्य विमा योजना राबवणार असल्याचे सांगितले. पुनश्च अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

कार्यसरणी पुढील प्रमाणे
अध्यक्ष; पंचाक्षरी स्वामी
उपाध्यक्ष; महेश पवार,नितीन वारे,गिरमल्ला गुरव, अशोक सोनकंटले
सचिव:-बालाजी वाघे,सहसचिव:-शिवय्या स्वामी,
कार्याध्यक्ष : गुरू गायकवाड,
सहकार्याध्यक्ष:-अभिजीत जवळकोटे
संघटक:-अप्पू देशमुखखजिनदार; समीर शेख
प्रसिद्धीप्रमुख:-राहुल उड्डाणशिव
सदस्य:-महासिध्द साळवे,कल्लय्या स्वामी, प्रमोद जवळकोटे, गजानन काळे,बनसिध्द देशमुख,बनसिध्द सलगर,
प्रमुख सल्लागार:- अमोगसिध्द लांडगे, बबलू शेख, दिनकर नारायणकर, प्रभू पुजारी
मार्गदर्शक; प्रशांत जोशी,अप्पासाहेब गंचिनगोटे,राजकुमार सारोळे,अप्पासाहेब हत्ताळे, विठ्ठल खेळगी, विठ्ठल सुतार, विनोद कामतकर,विजय साळवे











