सोलापूर : आरोग्य विभाग कृति समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रकाश माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचा सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कृति समितीने दिलेली जबाबदारी आणि जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या अभ्यासपूर्वक पध्दतीने सोडवून योग्य न्याय देण्याचा निशिचय जिल्हाध्यक्ष माने यांनी केला.
माने हे जिल्हा सरचिटणीसमधून २५ व तांत्रिक सोसायटीच्या दोन वर्ष चेअरमन म्हणून काम केले आहे. यावेळी राज्य अध्यक्ष संजय उपरे, राज्य उपाध्यक्ष पांडुरंग कोळी, राज्य सरचिटणीस चंद्रकांत पवार, राज्य उपाध्यक्ष अभिजीत कांबळे, राज्य सहसचिव शिवाजी येडगे, राज्य कोषाध्यक्ष विष्णू सानेपागुल, मिसबाह शेख, काशिनाथ गाडे. प्रशांत घोडके, महिला जिल्हाध्यक्ष रोहिणी सुगंधी, उमेश पाटील, अंबादास मिटले, रफिक शेख, काशिनाथ कलाल, संतोष बुटे, प्रकाश बिराजदार आदी उपस्थित होते.







