सोलापूर : पोलिस रेझिंग डेच्या पोलिस आयुक्तालयात शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना पोलिसांचे काम, कर्तव्य, सायबर सेल, रेझिंग डे, डायल ११२, आदी विषयी पोलिसांनी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनीही कुतूहलापोटी विविध प्रश्न विचारले, त्यांना समाधानकारक उत्तरे पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली. २ जानेवारी हा दिवस पोलिस रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पोलिस आयुक्तालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात के. एल. ई. इंग्लिश २ जानेवारी १९ ६१ रोजी राज्यात पोलिस दलाची स्थापना झाली मीडियम स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, कॅम्प शाळा येथील २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी विद्यार्थ्यांना पोलिस बॅन्डचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त गौहर हसन, विजय कबाडे, डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजन माने यांची प्रमुख उपस्थिती होती
या कार्यक्रमाचे नियोजन सहायक पोलिस आयुक्त राजन माने व पोलिस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक स्वाती येळे, पोलिस उपनिरीक्षक अश्विनी काळे, अंमलदार शीतल माने, सीमा खोगरे, सरस्वती घाडगे, इंदिरा राठोड, कविता डांगे, नसीमा शेख, नीलम माळवे, अरुणा परब, सविता म्हेत्रे, उषा मळगे, प्रिया ढेपे, सुजाता जाधव यांनी केले. यात एकूण २०० विद्यार्थी उपस्थित होते.











