सोलापूर: येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकारीपदी संजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत.संजय देशमुख हे सध्या याच महाविद्यालयात कार्यालयीन अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

प्रशासकीय अधिकारी हे पद पदोन्नती किंवा सरळ सेवेने नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत रिक्त राहणार आहे. त्यामुळे प्रशासकीय कामात खंड पडू नये, यासाठी देशमुख यांनी त्यांच्या मूळ पदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या सांभाळून प्रशासकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा, अशा सूचना या आदेशात देण्यात आल्या आहेत.
यापूर्वी या पदाचा पदभार मेळकुदळे यांच्याकडे होता. संजय देशमुख यांच्या या नियुक्तीमुळे महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामाला गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.










