सोलापूर : उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी, व महापुरामुळे सीना, भीमा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना फटका बसला आहे. या भागातील विजेचे खांब पडल्याने व डीपी पाण्यात गेल्याने नादुरूस्त झाले आहेत. पाकणीपासून शिवणी, तिहे, पाथरी, तेलगाव, डोणगाव, कवठे, समशापूर ते दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील गावांमधील वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्याकडे बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी केली आहे. यावेळी डॉ. पृथ्वीराज माने, सोमनाथ गायकवाड, गोवर्धन जगताप, अशोक गुंड, रवींद्र शिंदे, अजय सोनटक्के, संजय राठोड, उद्धव बंडगर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

शिवणीचे पुनर्वसन करा
उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी गाव वसल्यापासून २० वेळा महापुराच्या विळख्यात सापडले आहे. या गावचे अन्यस्त्र जागेत पुनर्वसन करण्याची मागणी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे करण्यात आली







