७० जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; ५७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त
दक्षिण सोलापूर ; दक्षिण तालुक्यातील कंदलगाव गावाच्या शिवारामध्ये असलेल्या पुष्पक ऑर्केस्ट्राबार मध्ये काही महीला तोकडे कपडे घालुन बिभत्सपणे अश्लील हावभाव व नृत्य करून डि.जे. वर नाचत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. त्यावरून त्यांनी विशेष पथकास सुचना देऊन डान्सबारवर कारवाईचे आदेश दिले . त्या अनुषंगाने विशेष पथक मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील कंदलगाव येथील पुष्पक ऑर्केस्ट्राबार येथे कारवाई करीता गेले असता तेथे मिळुन आलेल्या बातमी प्रमाणे १२ महिला तोकडे कपडे घालुन बिभत्सपणे अश्लील नृत्य व हावभाव करूण डिजे च्या तालावर अश्लील नृत्य करीत असल्याचे व तेथील ग्राहक नृत्यांगनावर नोटा सदश्य कुपन उधळुन अश्लील हावभाव करून नाचताना मिळुन आले .
तसेच समोर बसलेले काही लोक तसेच स्टेजच्या समोर देखील काही लोक बसले होते, ते नोटा सदश्य कुपन त्या महिलावर उधळत होते. त्या ठिकाणी एकुण १२ बारबाला मिळुन आल्या असुन ५५ ग्राहक तसेच पुष्पक ऑर्केस्ट्राबारचे चालक भारत राजाराम तांबे, रा. शिवाजी नगर, बाळे, सोलापूर व मालक रोहित पांडुरंग चव्हाण, रा. सोलापूर अशा एकुण ७० लोकांविरूध्द मंद्रुप पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्पक ऑर्केस्ट्राबार येथून ५७ लाख रूपये किमतीचे ङि जे. साहित्य, ऑर्केस्ट्राबार मधील साहित्य तसेच वाहने, मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे
ही कारवाई ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनामध्ये सहायक पोलीस अधीक्षक राहुल अतराम, पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, सपोनि अनिल सनगल्ले, पोहेकॉ बिराजदार, पोहेकॉ. गोरे, पोकॉ. जाधव, पोकाॅ. गणेश पाटील, महिला पोकॉ. धनश्री हुळळे, महिला पोकॉ. राऊत, मंद्रुप पोलीस ठाणेचे मनोज पवार व त्यांचे कर्मचारी यांनी कारवाई केली आहे.
३१ डिसेंबरला पोलीस अधीक्षकांचा दणका
कंदलगाव येथील आॅर्केष्र्टा बारबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अनेक तक्रार करण्यात आले होते. त्याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले. मात्र पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांना गोपनीय माहीती मिळाल्यावर व परीसरातील नागरीकांना या डान्सबारचे त्रास होत असल्याबाबत कळाल्यावर त्यांनी विशेष पथकास कारवाइचे आदेश दिले. पोलीस अधीक्षकांनी ३१ डिसेंबरचे मूहूर्त साधून पुष्पक डान्सबारवर धडाकेबाज कारवाई केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.












