सोलापूर ; सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर महानगरपालिका प्रांगण येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी . नगरसेवक विनोद भोसले, हेमाताई चिंचोलकर, भीमाशंकर टेकाळे, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, सिद्धाराम चाकोते, लखन गायकवाड, परशुराम सतारेवाले, शिवशंकर अंजनालकर, सुमन जाधव, सागर उबाळे, भीमराव शिंदे, नागनाथ शावणे, सचिन सुरवसे, शुभांगी लिंगराज, शोभा बोबे, ज्योती गायकवाड, शिवाजी साळुंखे, अनिता भालेराव, आप्पा सलगर, चंद्रकला निजामल्लु, रतन डोळसे, आदी उपस्थित होते.







