सोलापूर : शहरात साथीदारांसह दंगा माजवणे, मारामारी करणे यासोबतच घातक शस्त्रांचा वापर करणारा संजय ऊर्फ संजीव नागनाथ उपाडे (वय ३४, रा. संतोष नगर, बाळे) याला सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. याबाबतची माहिती सोमवारी वाचक अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एन. एस. कानडे यांनी पत्रकाद्वारे दिली. आरोपी उपाडे याच्यावर २०१७, २०१८, २०१९, २०२१ व २०२४ मध्ये साथीदारांसह दंगा व मारामारी करणे, घातक शस्त्रांचा वापर करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्याकडून त्याच्या तडीपारचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. यामुळे त्याला पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी १७नोव्हेंबर रोजी त्याला तडीपार करण्याचे आदेश दिले.







